Thursday, 10 April 2014

दिवस कॉलेज चे

आठवतात दिवस कॉलेज चे,
ते दिवस होते फार सुखाचे,
पहिले पाउल नवीन कॉलेज मधले,
होते ते एका नवीन जगातले,

आठवतात नवीन झालेले मित्र मैत्रिणी,
सोबत चौपाटीवर बसून गायलेली गाणी,
छोट्या छोट्या गोष्टींवर झालेली भांडणे,
नंतर मात्र एकमेकांना मानवणे,
आता मात्र असे काही होत नाही,
गाणी तर दूर भांडणे सुद्धा होत नाही........

आठवते ग्रूप मध्ये केलेली एकमेकांची टिंगल,
आणि प्रोफेसर्स वर बनवलेली जिंगल्स,
वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जाणे,
कोणत्याही गोष्टीवर तिकडे वायफळ चर्चा करणे,
आता मात्र असे काही होत नाही.
मजा करण्याच्या विचारसही वेळ मिळत नाही........

आठवतात कॉलेजच्या फेस्टिवल मध्ये केलेले डान्स,
आणि गर्लफ्रेंड सोबत केलेले रोमान्स,
मित्रांसोबत रात्रभर बाहेर फिरून केलेली मजा,
घरी उशिरा आल्याने मिळालेली सजा,
आता मात्र असे काही होत नाही
कामामुळे कधी कधी घरी यायला पण मिळत नाही

गेले ते दिवस
गेली ती मजा,
आता फक्त उरल्यात
आठवणी मनात माझ्या.......

Tuesday, 8 April 2014

असेच एक स्वप्न

असेच एक स्वप्न पाहिले
ते स्वप्नाच राहून गेले
कागदावरती उतरवलेले
शब्दातच राहून गेले....

त्या शब्दाच्या आठवणीने

हे मनही दाटून गेले,
पण त्याच्या अश्रून मधुनी
जणू सर्वच वाहून गेले  ......

त्या स्वप्नाचे आता मात्र


ठसेच राहून गेले

असेच एक स्वप्न पाहिले
ते स्वप्नाच राहून गेले

अशी साथीदार हवी

अशी साथीदार हवी, जी मला आपले म्हणू शकेल,
माझ्या सुख-दुखात, जी सहभागी होऊ शकेल,
आणि मी काहीही बोललो नाही,
तरी माझ्या मनातले जी जाणू शकेल,

कधी माझ्याकडून चूक झाली असता,
जी माझी समजूत घालू शकेल,
कुठे ठेच लागून पडलो असता,

मला उठवून पुढे चालण्यास प्रवृत्त करू शकेल.

मी पार खचलो असता,
जी मला धीर देऊ शकेल,
एखादे  संकट माझ्यावर आलं असता,
माझ्या मागे जी खंबीर पाने उभी राहू शकेल.

बाहेर चेहऱ्यावर हास्य असताना पण,
त्यामागचं दुक्ख जी जणू शकेल,
पावसातून चालत असताना पण,
पाणी आणि अश्रुतला फरक जी जणू शकेल.

अशीच हवी साथीदार मला,
जी माझ्या घरच्यांचा आदर करेल,
आणि जी मला समजून घेऊ शकेल.